
भोके येथे रेल्वे प्रवाशाचा 40 हजारांचा ऐवज लांबवला
रत्नागिरी : तरुणाची बॅग रेल्वे प्रवासात लांबवून 40 हजार रुपयांचा ऐवज लांबवण्याची घटना 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. कालावधीत भोके येथे घडली. याबाबत संदीप सुरेश कुमार (वय 33, रा. गोवा ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना अज्ञाताने त्यांची बॅग लांबवली. बॅगमध्ये 10 ग्रॅमची सोन्याची चेन, 2 मोबाईल, चांदीच्या 2 बांगड्या आणि पैंजण, रोख 4 हजार 700 रुपये असा एकूण 39 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार वाजे करत आहेत.