दोन महिन्यात रिफायनरी, अणुउर्जा प्रकल्पांचे भवितव्य होणार निश्चित
राज्यातले उद्योग एका मागून एक बाहेर जात आहेत. या पार्श्वभूमीवरती देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने पुढील दोन महिने हे महत्वाचे असणार आहेत. पुढील आठवड्यात सौदी अरेबियाचे राजा भारत भेटीवर येत आहेत. या वेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजा यांंच्यामध्ये रिफायनरीबाबत चर्चा होणार का आणि झाल्यास ती सकारात्मक असणार का याकडे निश्चित सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील राजापूर सर्वेक्षण आणि माती परीक्षण थांबवले आहे. तर यापूर्वी नाणार येथील रिफायनरी रद्द करण्यात आलेला आहे. शिवाय मधल्या काही काळामध्ये मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जवळपास साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प अद्यापही पुढे सरकताना दिसून येत नाही. राज्य सरकार प्रकल्पाबाबत सकारात्मक आहे. www.konkantoday.com