
नमनाला राज्यमान्यता मिळावी तशी जाखडीलाही राज्यमान्यता हवी -डॉ. विनय नातू.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने दुसरा नमन लोककला महोत्सव रत्नागिरीनंतर यंदा चिपळूणमध्ये होत आहे. नमनाला राजमान्यता मिळाली आहे, तसेच शक्ती-तुरा म्हणजे जाखडीलाही मिळायला हवी. सांस्कृतिक विभागाने या लोककलेलाही न्याय द्यावा.
शक्ती-तुर्यांमध्ये वाद असतात. तसे या लोककलेतील मंडळीनी, कलाकारांनी घालू नये, शासनाकडून जे मिळेल ते घ्या, राजाश्रय घ्या, मग त्यातून सुधारणा करता येतील, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित तीन दिवसांच्या नमन महोत्सवाचे उदघाटन डॉ. विनय नातू व मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.www.konkantoday.com