चिपळूण शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल होणार वर्षभरात खुला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत चिपळुणात उभारण्यात येणार्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला पावसाळ्यांतर गती आली अहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात येणार असून हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. ययापुढे पिलर कॅप, गर्डर व स्लॅबचे काम तातडीने पूर्ण करून वर्षभरात हा पूल वाहतुकीस खुला केला जाणार आहे. तत्पूर्वी, उड्डाणपुलाच्या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम आठवडाभरात सुरू केले जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विबागाच्या मार्गदर्शनाखाली ईगल कंपनीने पुढील वर्षात हा पूल खुला करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केलली आहे. येत्या काही दिवसांत आणखी कामगार वाढवून पुलाच्या कामाला आणखी गती देण्याची तयारी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्गाकडून केली जात आहे. www.konkantoday.com