गेल्या दहा दिवसात जिल्हा रूग्णालयात दिवसभरात सुमारे ३५ ते ४० प्रसूती बाहेरील डॉक्टरांकडून
जिल्हा शासकीय रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ रजेवर असल्याने रात्री होणार्या प्रसूतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दहा दिवसात जिल्हा रूग्णालयात दिवसभरात सुमारे ३५ ते ४० प्रसूती बाहेरील डॉक्टरांकडून करण्यात आल्या. गंभीर असलेल्या १८ प्रसूती केसेस डेरवण (चिपळूण) किंवा सीपीआरला (कोल्हापूर) पाठविण्यात आल्या. स्त्रीरोगतज्ञ डॉ. सांगवी दोन दिवसांत हजर होणार आहेत. त्यामुळे आणखी दोन दिवस ही परिस्थिती राहणार आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी दाखल होणार्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिला सुरक्षित प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल होतात. महिन्याला साधारण २५० हून अधिक महिलांची प्रसूती रूग्णालयात होते. प्रसूती विभागातील डॉ. सांगवी हे वैयक्तिक कारणासाठी पंधरा दिवस रजेवर आहेत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्मचारी व वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आहे.
www.konkantoday.com