असुर्डे येथे रुग्णवाहिकेत आईने दिला जुळ्यांना जन्म
रत्नागिरी : 108 रुग्णवाहिकेत दोन मुलांचा जन्म झाला. जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी रुग्णाला डेरवण येथे घेऊन जात असताना दोन बालकांना आईने जन्म दिला असून बालके आणि त्यांची आई सुखरूप आहेत. भाविका भास्कर वारोशी (रा. कुवे, लांजा) वारोशी यांना गुरुवारी रात्री 10.30 वाजता जिल्हा रुग्णालय येथून पुढील उपचारासाठी डेरवण येथे पाठविण्यात आले. 108 रुग्णवाहिकेत डॉ. शंतनू वाईकर या रुग्णासोबत होत्या. रुग्णवाहिका आरवली दरम्यान आल्यानंतर प्रसुतीकळा जास्त प्रमाणात सुरु झाल्या. शेवटी डॉ. शंतनू वाईकर यांनी सहायक महेश वडार यांना असुर्डे येथे रुग्णवाहिका थांबविण्यास सांगितले. यानंतर प्रसुती करण्यात आली.