मुंबई-सीएसटी-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेस इंदोर-कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेस आता विजेवर धावणार
कोकण रेल्वेमार्गे धावणार्या आणि वर्षभरातील सर्वच दिवस प्रवाशांनी हाऊसफुल्ल धावणार्या जनशताब्दी एक्स्प्रेस, इंदोर-कोचुवेली तसेच कोचुवेली-भावनगर या तीन गाड्यादेखील आता डिझेलऐवजी विद्युत इंजिनसह धावणार आहे. यापैकी मुंबई सीएसटी ते मडगाव दरम्यानची जनशताब्दी एक्स्प्रेस आजपासून मुंबईतून मडगावसाठी विद्युत इंजिनसह धावणार आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आधी मालगाड्या तर त्या पाठोपाठ ऑगस्टपासून टप्प्यटप्प्याने प्रवासी गाड्यादेखील विद्युत इंजिनासह चालवल्या जात आहेत. यानुसार आता मुंबई-सीएसटी-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेस इंदोर-कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेस ८ नोव्हेंबरच्या फेरीपासून विजेवर धावू लागली आहे. ही गाडी कोचुवेली ते इंदूर मार्गावर धावताना ११ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. याचबरोबर भावनगर ते कोचुवेली ही कोकण रेल्वेमार्गे धावणारी आणखी एक साप्ताहिक एक्स्प्रेस १५ नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे. ही गाडी कोचुवेली ते भावनगर मार्गावर धावताना १७ नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे. www.konkantoday.com