तुरूंगाधिकारी अमेय पोतदार यांची कल्याण येथे बदली
रत्नागिरी : जिल्हा विशेष कारागृहाचे तुरूंगाधिकारी अमेय पोतदार यांची कल्याण कारागृह येथे बदली झाली. पोतदार यांनी कारागृहात 5 वर्षे काम केले. गुरुवारी संध्याकाळी पोतदार यांचा निरोप समारंभ पार पडला. विविध संस्थांमार्फत जनजागृती कार्यक्रम घेतले. अनेक सामाजिक उपक्रम राबवले. कैद्यांचे समुदेशन व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यांची बदली झाल्याचे कळताच अनेकांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.