डीकॅड चित्रकला महाविद्यालयामध्ये कलासंस्कार व छंद वर्गांची सुरुवात

डीकॅड चित्रकला महाविद्यालय कलाविषयक अनेक उपक्रम राबवत असते. आज अनेक शाळांमध्ये चित्रकला विषय शिकवला जात नाही; त्यामुळे लहान वयातच चित्रकलेची आवड असून सुद्धा विद्यार्थ्यांना कला या विषयापासून वंचित राहावे लागते. आज चित्रकलेमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत, परंतु या विषयाची विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेत असताना पुरेशी माहिती मिळत नाही किंवा शाळांमध्ये त्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात नाही. अशामुळे विद्यार्थी चित्रकलेची आवड किंवा चित्रकलेमध्ये करिअर करण्याची इच्छा असूनसुद्धा अपुऱ्या माहितीमुळे करियरचे वेगळे क्षेत्र निवडतात.
आज चित्रकलेमधील लहान मुलांचा वाढता कल लक्षात घेऊन डीकॅड महाविद्यालय अशाच चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कलासंस्कार वर्ग सुरू करणार आहे. तसेच चित्रकला विषयाची आवड असणाऱ्या कलारसिकांसाठी छंद वर्ग सुरू करणार आहे. जेणेकरून अशा कलारसिकांना आपला नोकरी-व्यवसाय सांभाळून आपला छंद देखील जोपासता येईल.
विद्यार्थ्यांसाठी कलासंस्कार वर्गामध्ये चित्रकलेविषयी प्राथमिक माहिती, पेंटिंग, स्केचिंग, ड्रॉईंग, मातीकाम, पेपर क्राफ्ट, कोलाज, पेपर मॅशे, आर्टफिल्फ असे कलाविषयक अनेक विषय शिकविले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना आउटडूअर स्टडी (लँडस्केप – निसर्गचित्रण) सुद्धा शिकविले जाणार आहे.
हा कलासंस्कार वर्ग प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते १०:३० या वेळेत महाविद्यालयामध्ये घेतला जाईल. एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा मार्गदर्शन याच कलासंस्कार वर्गामध्ये केले जाईल. हा कलासंस्कार वर्ग दिनांक १३/११/२०२२ पासून सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी ९०२८४७३७९६, ९७६७४७४२९९, ९६७३६१५६८६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button