घराच्या चौथर्‍याचे काम करीत असताना चराचा थर कोसळून जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

घराच्या चौथर्‍याचे काम करीत असताना चराचा थर कोसळून जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी जांभुळआड येथील राहणारे विनायक शंकर चंदुरकर (३५) हे ८ तारखेला अभिषेक तोडणकर यांच्या घराच्या चौथर्‍याचे काम करीत होते. त्यावेळी अचानक चौथर्‍याचा थर कोसळल्याने त्याखाली सापडून विनायक चंदुरकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यातील विनायक चंदुरकर हे अभिषेक तोडणकर यांच्या मुळ घराच्या चौथर्‍याचे काम करण्यासाठी गेले होते. चौथर्‍याचे थर खोदून वाळूमिश्रीत माती घमेल्याने बाहेर टाकण्याचे काम चालू होते. यातील विनायक चंदुरकर हे चरात उतरून फावड्याने घमेल्यात माती भरून बाहेर काढीत असताना अचानक चराचा थर कोसळला तो विनायक चंदुरकर यांच्या अंगावर येवून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या सोबत असलेल्या कामगारांनी त्यांना खाजगी वाहनाने शासकीय रूग्णालयात दाखल केले होते परंतु तेथे त्यांचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button