एसबीआयचा अकाऊंट अपडेट नसल्याचे सांगून देवरूख येथील इसमाची २ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

आपला स्टेट बँक खात्याचा अकाऊंट अपडेट झाला नसून तो अकाऊंट अपडेट करण्यासाठी लिंक पाठवून फिर्यादी सचिन भालचंद्र गद्रे (५१, रा. मधली आळी, देवरूख) यांच्या जॉईंट खात्यातून २ लाख २२ हजार रुपये काढून घेवून अज्ञाताने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यातील फिर्यादी गद्रे यांना दीपक शर्मा नावाच्या इसमाने फोन करून त्यांचा एसबीआयचा अकाऊंट अपडेट नसून तो अपटेड केला नाही तर ब्लॉक केला जाईल असे सांगितले. त्यासाठी त्याने गद्रे यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी आलेला ओटीपी लॉगीनमध्ये भरला. त्यानंतर फिर्यादीच्या जॉईंट खात्यातून सुरूवातीला ९८ हजार ६३९ व दुसर्‍या वेळी ९८ हजार ६५३ रुपये आयएनबी ऍमेझॉन सेलर या अकाऊंटमध्ये फिर्यादीच्या संमतीशिवाय ट्रान्स्फर झाले त्यामुळे फिर्यादी गद्रे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी देवरूख पोलीस स्थानकात ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button