शिव प्रतिष्ठान व समस्त रत्नागिरीकर यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाला माजी आमदार बाळासाहेब माने यांची उपस्थिती
आज त्रीपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून शिव प्रतिष्ठान व समस्त रत्नागिरी कर बंधू बघीनी नागरिक मिळून मारुती मंदिर येथे दीपोत्सवाचे आयोजन केले होते, 1000 दिव्यांची आरास करण्यात आली तर या दीपोत्सवातील पहिला दीप भाजपचे नेते माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करण्यात आला. यावेळी शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष राकेश दादा नलावडे, व प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते व रत्नागिरीकर नागरिक adv.अमित काटे,सिद्धेश सावंत देसाई, तेजस सावंत यश डोंगरे, अक्षत सावंत ,जयदीप साळवी, युवराज मिहीर माने व अनेक रत्नागिरीकर पुरुष व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते पहिला दीप प्रज्वलित करताना अनेक रत्नागिरी कर सुजाण नागरिकांनी, ज्या प्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबानी शरयू नदीकीनारी दीपोत्सव साजरा केला तसा त्यांच्याच पक्षाचे अनुयायी माजी आमदार बाळासाहेब माने यांनी रत्नागिरीत साजरा केला अशा अनेकांच्या तोंडून प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. मारुती मंदिर सर्कल मधील शिवसृष्टी चे सौंदर्य खूपच आकर्षित करत होते सार्यांना.