
तिघांना निलंबित केल्याने खेड कॉंग्रेसमध्ये उफाळली अंतर्गत गटबाजी
इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहत पक्षहिताला बाधा आणलल्याचा ठपका ठेवत येथील कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी तिघांचे तडकाफडकी निलंबन केल्यानंतर धुसफूस चव्हाट्यावर आली असतानाच कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनीही तालुकाध्यक्षांच्या निष्क्रिय कारभाराचा पाढा वाचत त्यांच्या हटावाची मागणी करताना पलटवारही केला. यामुळे येथील कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळणार असून पक्षनेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. www.konkantoday.com