रत्नागिरी जिल्ह्यातील पाच शाळा ‘डिजिटल’
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 शाळांमध्ये वर्गखोल्यांचे संपूर्ण डिजिटलायजेशन करण्यात येणार आहे.
कोटक महिंद्रा बँक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट (एआयआयएलएसजी) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक दायित्व श्रेणी अंतर्गत शाळांसाठी हा शैक्षणिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ५ शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ होणार आहे.
दामले विद्यालय, राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा, डॉ. अब्दुल कलाम आझाद विद्यालय, पटवर्धन विद्यामंदिर आणि गोळप शाळा यांना सामाजिक दायित्व प्रकल्पाचा लाभ होणार असून या पाच शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये अत्याधुनिक डिजिटल शिक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.