मुंबई-गोवा महामार्गावर मौजे भोगाव पुलावर इको कार संरक्षक भिंतीला धडकून उलटल्याने अपघात, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी


मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवार ११ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौजे भोगाव पुलावर इको कार संरक्षक भिंतीला धडकून उलटल्याने अपघात घडला. या अपघातात 1 चा जागीच मृत्यू झाला तर 3जण जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, लिंगाप्पा कटेप्पा पातारे (वय २९, रा. आदर्शनगर कॉलनी नं. २, दिघी, पुणे) हा आपल्या ताब्यातील इको गाडी (क्रमांक एम.एच. १४ के एस ०२३१) घेऊन मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होता. मात्र, भोगाव पुलावर पोहोचताच भरधाव वेगात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इको कार थेट डाव्या बाजूच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळल्याने कार उलटली.या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५, रा. घरवली, ता. हवेली, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक लिंगाप्पा कटेप्पा पातारे (वय २९), नागेश मलके कांबळे (वय ३७, रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे) आणि विकास शंकर चव्हाण (वय १८, रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर मृतदेह आणि जखमींना शासकीय रुग्णवाहीकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून महामार्ग पोलिस विभाग कशेडी यांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा अधिक पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button