जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या पुढाकारातून ३० वे मरणोत्तर देहदान

नाणीज : श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून शिराळा (जि. सांगली) येथील कै. प्रकाश भाऊ खंडागळे यांचे मरणोतर देहादान करण्यात आले. संस्थानच्या पुढाकारातून हे ३० वे देहदान आहे.
कै. प्रकाश खंडागळे (वय ६०) यांचे काल निधन झाले. त्यांनी यापूर्वीच संस्थानकडे देहदान संकल्प अर्ज भरून दिला होता. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे बंधू श्री. शिवाजीराव बापूसाहेब खंडागळे यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानशी संपर्क साधून कराड (जि. सातारा) च्या कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स येथे आपल्या बंधुंचा देह सुपूर्द केला. मृताच्या आत्म्यास शांती लाभो अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
यावेळी शिवाजीराव बापूसाहेब खंडागळे ( आण्णा ) व इतर सर्व नातेवाईक आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सांप्रदायाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वश्री दिलीप सोमदे आप्पा, संजय थोरात, हर्षल जाधव, रामदास पाटील आप्पा, पांडुरंग मोरे, राजाराम मोरबळे जाधव व इतर भक्त गणांनी विशेष प्रयत्न करून वेळीच मारणोतर देह कृष्णा इन्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सकडे सुपूर्द केला. येथील अनोटॉमी विभागाच्या प्रमुख डॉ. जोशी मॅडम यांनी तो स्वीकारला. या उदात्त दानाबद्दल हॉस्पिटलनेही कुटूंबियांचे व संस्थांचे आभार मानले आहेत. तसे प्रमाणपत्रही दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button