
वेरळ येथे जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणारा युटीलिटी पोलिसांच्या ताब्यात
खेड : तालुक्यातील वेरळ गावानजीक शुक्रवारी दि.४ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तीन बैलांची निर्दयीपणे युटीलिटीमधून वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मुंबई – गोवा महामार्गावर बैलांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे युटीलिटी (एमएच ४३ एडी ४७४७) थांबवला असता, त्यामध्ये तीन बैल निर्दयीपणे वाहतूक करत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी युटीलिटी व चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.