महाराष्ट्राला सुवर्णपदक : संगमेश्वर तालुक्यातील खो-खो पटू अथर्व गराटेची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

देवरूख : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे 32 व्या राष्ट्रीय किशोर व किशोरी खो खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले. यात संगमेश्वर तालुक्यातील अथर्व गराटेने चमकदार कामगिरी केली.
या विजयी महाराष्ट्र किशोर संघात संगमेश्वर तालुक्याचा राष्ट्रीय खेळाडू अथर्व गराटेने आपल्या खेळाच्या कौशल्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून त्याचा देवरूखमध्ये भव्य सत्कार केला जाणार आहे. शहरातील छ. शिवाजी महाराज चौक देवरूख येथे हा सत्कार होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button