निवृत्तीवेतन धारकांसाठी आयकराबाबत आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान होणार्‍या सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात आले आहे. जे निवृत्तीवेतन धारक आयकर कपातीस पात्र आहेत, ज्यांचे वार्षिक निवृत्तीवेतन रु.5,00,000/- पेक्षा अधिक आहे,  त्या निवृत्तीवेतन धारकांनी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील जिल्हा कोषागार कार्यालयाकडे त्वरित सादर करावा. सदर तपशील सादर न केल्यास, नियमानुसार आयकर कपात त्यांच्या निवृत्तीवेतनातून करण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकांनी आपली आयकर माहिती तत्काळ कोषागारास सादर करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय, रत्नागिरी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button