
कंटेनर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने महामार्गालगतचा कठडा तोडून कंटेनर २० फूट खोल खड्ड्यात कोसळला
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने महामार्गालगतचा कठडा तोडून कंटेनर २० फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाट येथे घडली .सदर मालवाहू कंटेनर हा गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता .शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्याने वेरळ घाटातील यू आकाराच्या वलनाच्या वरील बाजूला असलेल्या तीव्र उताराच्या ठिकाणी छोट्या वळणावर कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर कठडा तोडून थेट महामार्गालगतच्या २० फुट खोल खड्ड्यात कोसळला.सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या अपघातामध्ये कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com