रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रशासक राजवटीत दाखले व उतारे शुल्कात दुप्पट वाढ नागरिकांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी

रत्नागिरी नगरपरिषदेकडून नागरिकांना आवश्यक दाखले, उतारेच्या शुल्कात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. पालिकेचा ठराव केल्यानंतर आता जाहिर सुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी हरकत न घेतल्यास १ जानेवारी २०२३ पासून नव्या दाराची अंमलबजावणी होणार आहे. सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने आता दरवाढीला विरोध करायचा झाल्यास त्याबाबत नागरिकांनी आपल्या हरकती रत्नागिरी नगरपालिकेकडे लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत. रत्नागिरी शहरात असलेल्या अनेक सोयी सुविधांचा अभाव, खड्डेमय रस्ते,गटारे, अशा अनेक समस्या असलेल्या परिस्थितीत करांमध्ये होणारी वाढ ही रत्नागिरी करांसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
पालिकेने केलेल्या ठरावानुसार असेसमेंट उतारा २०० रु., असेसमेंट नाव दाखल व दुरुस्त करणे ७५० रु., व्यावसायिकसाठी २००० रु., वसुली विभागाकडून देण्यात येणारे सर्व दाखले २०० रु. प्रत्येकी, भुखंड नसलेबाबत २००रु. सव्र्हेक्षण उतारा २० रु. प्रती प्रत असे दर आकारण्यात येणार आहेत. पुर्वी हे दर निम्मेच होते. त्यामुळे दुप्पटीने वाढ केलेल्या नव्या दरवाढीवरुन पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
सध्या पालिकेत नगरसेवक नाहीत. तर प्रशासकांच्या ताब्यात पालिकेचा कारभार आहे. अशा वेळी दरवाढ करण्याचे अधिकार थेट प्रशासकांना आहेत. या दरवाढीमुळे नागरिकांच्या प्रचंड प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे
नागरिकांनीही जागृत त्याला कोण या दरवाढीबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती घेणे जरुरीचे आहे प्रशासन राजवटी ती दरवाढ केल्याने लोकप्रतिनिधी मात्र गप्प बसून आहेत ही वाढ करताना नगरपरिषदेने कोणतेही सयुक्तिक कारण दिलेले नाही त्यामुळे येणार्या नगरपरिषद निवडणुकीत याचा सर्वच पक्षांना नाराजीचा फटका बसू शकतो
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button