दागिन्यांसाठी महिलेचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला, देवरुख येथील प्रकार
दागिन्यांसाठी महिलेचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्याचा प्रकार देवरुख येथे घडला आहे शारदा दत्ताञय संसारे (८०)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे
देवरुख क्रांतीनगर विभागातील अपार्टमेंट मध्ये टेरेसवरील पाण्याच्या टाकीत सोमवारी राञी या महिलेचा मृतदेह आढळून आला.अंगावरील दागिन्यांच्या चोरीसाठी हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला.याबाबत देवरुख पोलीसांनी माहिती देताना शारदा दत्ताञय संसारे (८०) व त्यांचा मुलगा दिपक दत्ताञय संसारे या अपार्टमेंट मध्ये रहात होते.सोमवारी सकाळी ९.३० वाजता फिर्यादी दिपक संसारे हे कामासाठी घराबाहेर पडुन गेले होते.दुपारी दिपक संसारे हे घरी परतले तर ब्लाॅकला कुलुप होते.दिपक यांनी आईचा शोध घेतला ,फोनाफोनी केली तरी त्यांना आईचा ठावठिकाणा लागला नाही.यामुळे दिपक संसारे यांनी सहकार्या मदतीने कुलुप तोडले.माञ आईचा शोध काही लागला नाही.संध्याकाळपर्यंत दिपक यांनी आईचा शोध घेतला.राञी घरी आल्यावर बाथरुम मध्ये हातपाय धुवायला गेल्यावर लालरंगाचे खून मिश्रित पाणी नळातुन आल्यावर दिपक यांची पाचावर धारण बसली.दिपक संसारे यांनी सहकार्याच्या मदतीने लगेच टेरेसवर धाव घेतली व पाण्याच्या टाकीत दिपक यांना साडी दिसुन आली. व टाकीत मृतदेह आढळला यावेळी आईच्या कपाळावर जखम दिसुन आली व अंगावरील दागिने चोरुन नेल्याचे दिसुन आले.यामध्ये हातातील पाटल्या,गळ्यातली माळ व कानातील कुडी गायब झाल्याचे निदर्शनास आले.हि बाब दिपक संसारे यांनी देवरुख पोलीसांना कळवली.देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली व तपासाची सुञे वेगाने हलवली.मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.देवरुख सारख्या सुसंस्कृत शहरात खूनासारखी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.घटनेचे गांभिर्य ओळखुन तपास तीन टप्प्यात सुरु झाला.रत्नागिरी पोलीस उपविभागिय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट दिली.मंगळवारी सकाळी घटनास्थळी ठसे तज्ञ,श्वानपथक व फाॅरेन्सिक लॅब तज्ञ दाखल झाले व तपास सुरु केला.श्वान बिल्डिंग परिसरातच घुटमळला.अज्ञाताविरुद्घ भा.द.वी.क. ३०२,२०१,३९४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाआहे
www.konkantoday.com