
शैक्षणिक प्रवेशासाठी गेलेली युवती सावर्डे येथून बेपत्ता
सावर्डे ः येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत शैक्षणिक प्रवेशाच्या चौकशीसाठी आलेली १६ वर्षीय युवती घरी परत न आल्याने १५ जून रोजी वडील युवराज रघुनाथ खानविलकर (रा. लांजा) यांनी ती हरविल्याची खबर सावर्डे पोलीस ठाण्यात दिली आहे.
विवली गावातील साक्षी युवराज खानविलकर ही १४ जूनला घरातून निघाली. ती सावर्डे येथे आली होती. परंतु ती पुन्हा घरी परतलीच नाही. त्यामुळे सावर्डे येथून ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार देण्यात आली आहे. ती कुणाला सापडल्यास किंवा दिसल्यास खालील नंबरवर ९२०९८६९९१५, ९४२०७६७२८१ वर संपर्क साधावा असे आवाहन तिच्या नातेवाईकांनी केले आहे.