चिपळुणात 25 लाखांच्या विदेशी मद्यासह कंटेनर जप्त

चिपळूण : सोमवारी (दि.31) रात्री पाऊणेदोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते येथे गोवा बनावटीच्या मद्याने भरलेल्या कंटेनरवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 25 लाखांची गोवा बनावटीची दारु चिपळूण पोलिसांनी जप्त केली. पुण्यातील मुळशी येथील कंटेनर चालक व मालक बाबासाहेब बुधवंत याला अटक केली आहे. दहा लाखांचा कंटेनर देखील जप्‍त करण्यात आला आहे. एकूण 35 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईत बियर व दारूचे  900 बॉक्स जप्‍त करण्यात आले असून यामध्ये बियर 198 बॉक्स, आयबी 48 व अन्य प्रकारच्या दारुचे बॉक्स जप्‍त करण्यात आले आहेत.  कळंबस्ते येथे  हा कंटेनर पोलिसांनी अडविला व पोलिस ठाण्यात आणून संबंधितांवर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, पोलिस हवालदार श्री. चव्हाण, उपनिरीक्षक श्री. साळोखे व अन्य पोलिसांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button