जयगड चरेवाडी येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या
रत्नागिरी : युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार जयगड चरेवाडी येथे उघडकीस आला आहे. राहुल एकनाथ जांभळे (वय 23) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राहुलने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या लोखंडी बारला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्याची आई आणि भाऊ नांदिवडे येथे गेले होते. घरी परत आल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिला. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.