चिपळूण पेठमाप येथे जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह
चिपळूण ः चिपळुणात एका महिलेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या महिलेने जाळून घेतले की तिला जाळून मारण्यात आले, याबाबत चर्चा परिसरात सुरू आहे. सोमवारी सकाळी ही घटना शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला येथे घडली. गनी मुकादम यांच्या घरामध्ये ही महिला भाडेकरू म्हणून राहत होती. सायंकाळी पोलिस घटनास्थळी गेले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. याबाबत संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त होत असून पोलिस तपास करत आहेत.