दुचाकी विकायच्या बहाण्याने 40 हजारांची फसवणूक
दुचाकी विकायच्या बहाण्याने तरुणाकडून वेळोवेळी असे 40 हजार रुपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 27 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत हातखंबा येथे घडली आहे.
हंसराज हनुमंत कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात आदित्य वामन कळंबटे (वय 21, रा. झरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, कदमने आदित्य कळंबटे यांना फोन करून होंडा शाईन दुचाकी विकायची असल्याचे संगितले. तसेच डिलिव्हरी चार्जेस म्हणून प्रथम 1550 रुपये भरण्यास सांगून वेळोवेळी पैसे
मागितले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आदित्यच्या भावाने एकूण 40 हजार रुपये गुगल स्कॅनरने कदमला पाठवले. परंतु त्यानंतर गाडीबाबत विचारणा केली असता कदमने उडवाउडवीची उत्तरे देऊन फसवणूक केली. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करत
आहेत.