
रस्त्याच्या कामामुळे शहर बस वाहतूक रहाटाघर बसस्थानकातून
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने मुख्य बसस्थानक परिसरातून होणारी शहर बसवाहतूक रहाटाघर येथून करण्यात येणार आहे. यामध्ये मिर्या, सड्ये, आरे, शिवरेवाडी, साखरतर, आडी, काळबादेवी, बसणी आदी बसमार्गाचा समावेश आहे. तरी या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन एसटी रत्नागिरी आगाराकडून करण्यात आले आहे.www.konkantoday.com