
जांभरूण येथून विवाहिता बेपत्ता
रत्नागिरी : जांभरूण कातळवाडी येथून रेवती राजेश रांबाडे (वय 26 वर्षे) या 23 ऑक्टोबर 2022 पासून बेपत्ता झाल्या आहेत. या व्यक्तीचे वर्णन रंग सावळा, केसाचा आंबेडा, चेहरा गोल उभट, डोळे काळे, नेसणीस आकाशी रंगाची पाचवारी साडी, अंगात राखाडी रंगाचा ब्लाऊज, गळ्यात चांदीचे मढवलेले व एक ढवली असलेले मंगळसूत्र, कानात कुडी, नाकात सोन्याची फुली, हातात हिरव्या बांगड्या, पायात पेरवी पर्स व मोबाईल फोन आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा.