
खेडच्या ओम शिंदेची भारतीय संघात निवड
खेड : इंडियन पिंच्याक सिलॅट काश्मिर असोसिएशनमार्फत श्रीनगर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सिनियर स्पर्धेत खेड येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी ओम शिंदे याने पिंच्याक सिलॅट खेळात सुवर्णपदक पटकावले. त्याची फिलिपिन्स येथे दि. 4 ते 13 डिसेंबर कालावधीत होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
ओम शिंदेने 17 ते 45 वयोगटातील 85 वजनी गटात यश प्राप्त केले. महाराष्ट्रातून तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली असून त्यामध्ये ओमचा समावेश आहे. जिल्हा संघटना अध्यक्ष हर्षदीप सासणे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपाध्यक्ष वैजेश सागवेकर, संस्थाध्यक्ष हिराचंद बुटाला, कौस्तुभ बुटाला, प्राचार्य बोराटे, संघटना कोषाध्यक्ष क्षितीज शिंदे आदी उपस्थित होते.