लांजात साजरा झाला कोकणातील सर्वात मोठा दीपोत्सव

लांजा : लांजातील फ्रेंड्स ग्रुपने सलग १७ वर्षी कोकणातील सर्वात मोठा दीपोत्सव आणि महाराष्ट्रातील तृतीय क्रमांकाचा दीपोत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी १७,७७७ दीप प्रज्वलित करून लांजा शहर प्रकाशमय करण्यात आले. फ्रेंड्स ग्रुप लांजाच्यावतीने दरवर्षी हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दीपोत्सवाचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे, नगरसेविका यामिनी जोईल, नगरसेवक नंदराज कुरुप, स्वरूप गुरव, संजय यादव तसेच गुरुप्रसाद देसाई, वैभव जोईल, राजेंद्र धावणे, राजेश शेट्ये, विश्वनाथ मांगले, बापू लांजेकर, संजय बावधनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button