रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या फराळाला महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
रत्नागिरी : शहरात दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार राजन साळवी यांच्यासह काँग्रेस नेतेही उपस्थित होते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या फराळाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होणार हे यावरून निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी फराळ स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, काँग्रेसच्या महिला नेत्या अॅड. अश्विनी आगाशे, रूपाली सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. मागील काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली होती.