
मंडणगड नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात
मंडणगड नगरपंचायतीच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीकरिता काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. तर नगरपंचायतीच्या ४ जागांवर होणारी निवडणूक रद्द करण्यात आल्याने एकूण १७ जागापैकी १३ जागांकरिता ही सार्वत्रीक निवडणूक पार पडणार आहे.मंडणगड नगरपंचायत निवडणुक रिंगणात अनेक प्रभागात बहुरंगी तर बऱ्याच दुरंगी लढती होणार हे नक्की झाले असून, मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीत एकत्र आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीसमोर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांचे तगडे आवाहन उभे आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी आणि बंडखोर यांच्या लढतीकडे संपुर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागुन राहीले आहे. या सार्वत्रीक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णय प्रक्रीयेतून वगळण्यात आलेले शिवसेनेचे आमदार योगेश कदम हे त्यांच्या गटाच्या बंडखोरांना रसद पुरविणार की सेना राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांचा प्रचार करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com