
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची हिंदुत्वादी संघटनांची मागणी
रत्नागिरी ः महान क्रांतीकारक व साहित्यिक स्वा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती व हिंदू राष्ट्रसेना आदीं संघटनांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. नुकतेच या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देवून निवेदन दिले.
बालभारतीच्या सातवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करणार्यांवर कारवाई करावी. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या प्लास्टीक बंदीच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन करणार्या कृती समितीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी हिंदू जागृती समितीचे संजय जोशी, हिंदूराष्ट्र सेनेचे सागर कदम, श्री शिवप्रतिष्ठान रत्नागिरीचे गणेश गायकवाड आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com