कर्ला येथे महिलेची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी : कर्ला येथे महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.  शमशाद शौकत मुकादम (55, रा. कर्ला, रत्नागिरी) असे तिचे नाव आहे. कर्ला  बसस्टॉपजवळ शमशाद मुकादम या घरी एकट्याच राहत होत्या. सोमवारी दुपारी 2 वा. पूर्वी त्यांनी राहत्या घराच्या सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने  घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button