गुहागर तालुक्यातील शांताई रिसॉर्ट मध्ये मिसळ महोत्सवाचे आयाेजन
गुहागर तालुक्यातील शांताई रिसॉर्ट मध्ये मिसळ महोत्सवाचे आयाेजन
दीपावली नंतर तीन दिवस होणार आहे. अशी माहिती शांताई रिसॉर्टचे मालक सिद्धेश खानविलकर यांनी दिली.
प्रत्येकाला काही ना काही तरी खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते. मग हेच खाद्यपदार्थ शोधत आपण अनेक ठिकाणी भ्रमंती करत असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपला आवडता पदार्थ मनसोक्त खाऊन तृप्त होत असतो…. मात्र असाच जो पदार्थ तो सगळ्यांना आवडतो त्याच पदार्थाचे विविध प्रकार जर तुम्हाला एकाच ठिकाणी खायला मिळाले तर कसं…… होय असाच एक मिसळ महोत्सव गुहागर तालुक्यात शांताई रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात येतोय.
गुहागर तालुक्यातील शांताई रिसॉर्ट एक नावाजलेले नाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण निसर्गसौंदर्य नटलेला शांताई रिसॉर्ट अनेक वेळा या ठिकाणी सामाजिक उपक्रम विविध कार्यक्रम राबवत तालुक्यात रोजगार कसा निर्माण होईल यासाठी शांताई रिसॉर्टचे मालक सिद्धेश खानविलकर हे प्रयत्न करत असतात.
ऑक्टोबर महिन्यातील 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर यादरम्यान सलग तीन दिवस हा मिसळ महोत्सव चालणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत या मिसळ महोत्सवाचा आनंद आपल्याला घेता येणार आहे. गुहागर चिपळूण मार्गावरील मोडकाआगार येथील शांताई रिसॉर्ट मध्ये या मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी महाराष्ट्रातील तमाम आठ शहरातील नामवंत मिसळ आपल्याला या ठिकाणी चव घेता येणार आहे. या मिसळ महोत्सवाचा आयोजन केले शांताई रिसॉर्ट व प्रसिद्ध शेफ निलेश लिमये यांनी …….होय तेच निलेश लिमये ज्याना तुम्ही आपल्या टीव्हीवर अनेक खाद्यपदार्थ त्यांच्या डिश कशा तयार करता हे पाहता तेच या महोत्सवाचा प्रमुख आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात कोल्हापुरी झटका पुणेरी किरकट, नाशिकचा फटका, नागपूरची तरी, सिन्नरचा खटका आणि शांताई स्पेशल अशा मिसळ आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
गुहागर सारख्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारे मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा तमाम महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी मिसळ खाण्यासाठी आपल्याला 28 ऑक्टोबर पासून पुढील तीन दिवस मिसळ महोत्सव मध्ये येऊन त्याची चव ही चाखावी लागणार आहे.
www.konkantoday.com