शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजनेबाबत आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या मुलींच्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहाबाबत शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रतीजोडपे रुपये 10 हजार एवढे अनुदान शुभमंगल सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाह योजना या योजनेंतर्गत देण्यात येते.
निराधार किंवा परित्यक्ता आणि विधवा महिलांच्या केवळ 2 मुलींच्या विवाहाकरिता या योजनेतंर्गत अनुदान देण्यात येते. तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सामूहिक विवाह सोहळा राबवू इच्छिणार्‍या स्वयंसेवी संस्थांनी तसेच नोंदणीकृत विवाह केलेले व विधवांच्या मुली यांनी जिल्हा महिला  व बालविकास अधिकारी कार्यालय रत्नागिरी, जेलरोड यांच्याशी  संपर्क साधावा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रत्नागिरी यांनी ही माहिती दिली आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह सोहळ्याची योजना, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येईल. या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे असतील.  वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. विवाहावेळी वधूचे वय 18 वर्ष व वराचे वय 21 वर्ष पूर्ण असावे.  वधू-वरांना प्रथम विवाहासाठी हे अनुदान देय असेल, तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुदान देय असेल.
लाभार्थी हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून 7 /12 चा उतारा. लाभार्थी हा शेतकरी किंवा शेतमजूर असल्याचा पुरावा म्हणून तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा दाखला. लाभार्थ्याच्या पालकाचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न रुपये 1 लाखाच्या आत असावे. सदर योजनेंतर्गत अनुदान मंजुरी मिळण्यासाठी अ.जा. /अ.जमाती / वि.ज. / भ.ज. / वि.मा.प्र. या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाहीत. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी किमान 5 व जास्तीत जास्त 100 दाम्पत्य असणे आवश्यक आहे. संस्थेने सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांना विवाह झाल्यापासून एक महिन्याच्या आत, निबंधक विवाह नोंदणी याचे प्रमाणपत्र मिळवून द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button