दिवाळीसाठी कोकण रेल्वेच्या गाडय़ा झाल्या हाऊसफुल ,मेंढरांसारखे डब्यात कोंबून बसले प्रवासी
सध्या मुंबई गोवा महामार्गाची अनेक भागांत वाताहात झाली असताना कोकणातील चाकरमानी हक्काचा प्रवास म्हणून कोकण रेल्वेने प्रवास करीत असतात दिवाळीच्या सुटीत अनेक चाकरमानी आपल्या गावात मुलाबाळांसह येत असतात मात्र कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना गर्दी उफाळली आहे जनरल डब्यांमधून प्रवास करताना अनेकांना तर गाडीत प्रवेशच मिळू शकत नाही आज कोकण रेल्वेला अनेक वष्रे पूर्ण झाल्यानंतरही गर्दीच्या काळात असलेली समस्या अद्यापही कायम आहे कोकण रेल्वेच्या गाडय़ा ठाणे स्थानकात काही मिनिटे थांबतात २२ ऑक्टोबर रोजी ठाण्यात आलेल्या गाड्या पूर्णपणे भरून आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना दरवाजातून प्रवेश करणे शक्यच होत नव्हते त्यामुळे डब्यात शिरण्यासाठी महिला पुरुषांनी मुलानी अक्षरक्षा खिडकीचा आधार घेतला त्यावेळी प्रवाशांच्या नातेवाइकांनी व काही सामाजिक कामात आघाडीवर असलेल्या तरुणांनी या प्रवाशांना अक्षरशः खिडकीतून आत उचलून पाठविले डब्याची क्षमता शंभर दीडशे असतानादेखील डब्यात अक्षरशः चारशे ते पाचशे प्रवासी दाटी दाटीने कोंबून बसले होते कोकणात जाण्याचा दृढनिश्चया मुळे हे प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करतात कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी गेली अनेक वष्रे कोकण रेल्वे प्रवासी संघ ही रजिस्टर संघटना प्रयत्न करीत आहेत मात्र अद्यापही ही परिस्थिती बघितल्यावर ग्राउंड लेव्हलला अद्यापही भरपूर काम करणे आवश्यक असल्याचे या संघटनेचे मत झाले आहे कोकणातून धावणारी ही कोकण रेल्वे नेमकी कोणासाठी आहे सणाला जाणारे चाकरमानी दरवर्षी या परिस्थितीला तोंड देत आहेत त्याच्यात बदल होणार की नाही हा प्रश्न कायमच आहे नेहमी प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील कोकणातील आपल्या बांधवासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे या प्रश्नाकडे राजकारण म्हणून न बघता सामाजिक काम म्हणून लोकप्रतिनिधींनी पाहिले पाहिजे व तशा पद्धतीने आवाज उठवणे गरजेचे झाले आहे
www.konkantoday.com