गुहागरमध्ये 10 गावांनी नाकारली जलजीवन मिशन योजना
गुहागर : शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजनेसाठी गुहागर तालुक्यातील एकूण 119 पैकी सुमारे 90 गावांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून 76 महसुली गावांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. यामध्ये मुबलक पाणी असलेल्या 10 महसुली गावांनी ही योजना नाकारल्याची माहिती गुहागर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
शासनाची ‘जलजीवन मिशन पाणी योजना’ ही महत्वाकांक्षी योजना आहे. गावातील प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकापर्यंत 2024 पर्यंत पाणी देण्याची केंद्र व राज्य सरकार यांची एकत्रित योजना असून यासाठी भरपूर प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. गुहागर तालुक्यात एकूण 119 महसुली गावे आहेत. यापैकी 90 गावांची अंदाजपत्रके सादर करण्यात येऊन एकूण 76 गावांना तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. ज्या गावांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे अशा दहा गावांनी ही योजना नाकारली आहे. मात्र, जी गरजू गावे आहेत त्यांच्याकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.