नाचणे येथून दुचाकी लांबवली
रत्नागिरी : नाचणे शांतीनगर येथील बिल्डिंगच्या पार्किंगमधून अज्ञाताने अॅक्सेस दुचाकी लांबवली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वा. कालावधीत घडली आहे. राहुल तुकाराम चव्हाण (वय 30, रा.निसर्ग वसाहत शांतीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वा.राहुल चव्हाण यांनी आपली अॅक्सेस दुचाकी (एमएच-08-एवाय-8222) बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लावून ठेवली होती. ती अज्ञाताने चोरून नेली. दुसर्या दिवशी दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजूला दुचाकीचा शोध घेतला. ती चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस हवालदार घोसाळे करत आहेत.