
मुंबई गोवा महामार्गाची दशा पाहण्यासाठी पेण तालुक्यातील पाटणी गावाचा चैतन्य लक्ष्मण पाटील हा युवक पळस्पे -पनवेल येथून झाराप सिंधुदुर्ग पर्यंत पायी चालणार
मुंबई-गोवा महामार्गाचे गेले 13 वर्ष सुरू असणारे विस्तारीकरण आतापर्यंत किती झाले आहे, या महामार्गावर अजूनपर्यंत किती खड्डे आहेत, किती ओव्हरब्रिज होणे बाकी आहे, अजूनपर्यंत अजून किती सर्विस रोड होणे बाकी आहे, अशा प्रकारची एकूणच महामार्गाची दशा पाहण्यासाठी पेण तालुक्यातील पाटणी गावाचा चैतन्य लक्ष्मण पाटील हा युवक पळस्पे -पनवेल येथून झाराप सिंधुदुर्ग अशी महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेपर्यंत पायी चालत रक्षाबंधनाच्या दिवसापासून निघाला आहे.या त्याच्या प्रवासात एकूण खड्डे आणि महामार्गाची दशा पाहता तो झारापपर्यंत कधी पोहोचेल हे तोही सांगू शकत नाहीमहामार्गावरील प्रत्येक खड्ड्याचे तो फोटो घेऊन त्याचे लोकेशन गुगल द्वारे अपडेट घेऊन तो संबंधित महामार्गाच्या अभियंत्यांना पाठवत आहे, जेणेकरून तोच खड्डा तेच लोकेशन असेल यावरून तो खड्डा किमान भरला जावा ही त्याची अपेक्षा. मार्गावरील एवढे खड्डे आणि काही ठिकाणी तर पूर्ण रस्ता हा उखडला गेलेला दिसत असल्याने या ठिकाणचे फोटो व्हिडिओ शूटिंग पाठवण्यासाठी त्याला वेळ लागत आहे. यामुळे पुढील पाचशे किलोमीटरच्या प्रवास करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील हे चैतन्य पाटील सुद्धा सांगू शकत नाही. मात्र तरीही सगळ्या खड्ड्यांचे फोटो अपडेट पाठवण्याचं मानस त्याचा आहे आणि तोपर्यंत त्याचा पायी चालण्याचा प्रवास तो थांबवणार नाही




