करंबेळे येथे एसटी व कारचा अपघात

संगमेश्वर : तालुक्यातील करंबेळे येथील अवघड वळणावर बस आणि इर्टिगा कार यांच्यात शुक्रवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात एस. टी. बस मधील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहे. तर इर्टिगामधील ड्रायव्हर एअरबॅगमुळे बचावला. हा अपघात सकाळी १० वा. च्या सुमारास घडला.
सविस्तर वृत्त असे की, देवरुखहून संगमेश्वरच्या दिशेने एस. टी. बस चालक अभिजित जाधव प्रवाशांना घेवून निघाले होते. करंबेळे घाटी येथील अवघड वळणावर मुंबईहून देवरुखला जाणाऱ्या इर्टिगा कारने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. एस. टी. बस मधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 1 इसम, 1 तरुणी आणि एक वृध्द महिलेचा समावेश आहे, तर इर्टिगा कारमधील २ दोघेजण एअरबॅग असल्यामुळे बचावले आहेत. नातेवाईकांच्या कार्यासाठी जात असताना करंबेळे घाटीत इर्टिगा चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाला असे बोलले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच देवरूख आगाराचे आगारप्रमुख पाथरे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींची विचारपूस केली. शिवाय जखमींना जागेवरच तातडीची मदत म्हणून ५०० रुपये दिले. अपघातानंतर एकेरी वाहतूक सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button