सांगवेत खैरांची कत्तल केल्याप्रकरणी कारवाई

पावस : संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावातील लाखो रुपयांच्या खैरांच्या झाडांची विनापरवाना कत्तल करून नेणार्‍यांवर वन खात्याने कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा जणांवर 14 हजार रुपयांची दंड आकारला. संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावातील अनंत आत्माराम शेलार यांच्या जागेतील लाखो रुपयांच्या  ऐंशीच्यावर खैराच्या झाडांची कत्तल करत ते परस्पर तोडून नेल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. जागा मालक शेलार आणि इतर हिस्सेदार यांनी देवरूखचे वनपाल (वन विभाग ) यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. वनखात्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि सदर प्रकरणाची पुढे चौकशी केली. दोषींवर 14 हजार रुपये दंडात्मक कारवाईचा आदेश जारी केला आहे. देवरूख वन विभागाचे वनपाल यांना संबंधितांकडून दंड वसुली करून जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांच्या ताब्यात देऊन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button