लांजात खवले मांजराला जीवदान

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ येथे सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याचा सुमारास रस्त्याच्या कडेला खवले मांजर आढळून आले. महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीमुळे खवले मांजर रस्त्यावरुन हलत नसल्याचे महामार्गावरील हॉटेल मालक अनिरुद्ध कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी ते खवले मांजर आपल्या हॉटेलमध्ये आणून ठेवले व या संदर्भातची माहिती उद्योजक किरण सामंत यांना कळविली. सामंत यांनी ही घटना वन विभागाला कळविली.
वेरळ येथील हॉटेल अनमोलचे मालक अनिरुद्ध कांबळे यांना हे खवले मांजर भेदरलेल्या अवस्थेत महामार्गालगत बसून राहिल्याचे निदर्शनास आले. त्यांना प्रथमदर्शनी हे खवले मांजर जखमी झालेले असल्याचे वाटले. त्यांनी तत्काळ त्याला प्रथमोपचारारासाठी आपल्या हॉटेलात आणले. मात्र, हे मांजर जखमी नसल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले. त्यांनी ही बाब किरण सामंत यांनी तत्काळ विभागीय वनाधिकारी यांना घटनेची माहिती दिली. विभागीय वन अधिकारी यांच्या आदेशानुसार लांजा येथील वनपाल व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. त्या वेळी वेरळ येथे सापडलेल्या खवले मांजरला कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याची खात्री करून वनपाल यांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, लांजा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत खवले मांजरची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याने खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या कार्यवाहीवेळी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे व सहाय्यक वनसरंक्षक सचिन निलख यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा येथील वनपाल दिलीप आरेकर व वनरक्षक विक्रम कुंभार यांनी पार पाडली.
वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आढळ्यास किंवा संकटात सापडल्याचे निदर्शनात आल्यास त्या संबधी वन विभागाचे 1926 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button