देवरूखमध्ये 21 पासून देवनगरी पर्यटन परिषद
देवरूख : कोकण पर्यटन उद्योग संघ मुंबई व रत्नागिरी जिल्हा सहकारी पर्यटन संस्था यांच्या मान्यतेने 21 व 22 रोजी देवनगरी देवरूख पर्यटन परिषद आणि गाईड ट्रेनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देवरूख क्रांती व्यापारी संघ व नगर पंचायत देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. पहिल्या दिवशी 21 रोजी सकाळी 10 वा. नगरपंचायत देवरूख येथील सभागृहात उद्घाटन होणार आहे. यावेळी महेश सानप, मंगेश कोयंडे, आमदार शेखर निकम हे मार्गदर्शन करणार आहेत. रोजगाराची संधी या ट्रेनिंगमधून उपलब्ध होणार आहे. गाईड ट्रेनिंगमध्ये आदरातिथ्य, देवनगरी देवरूखमधील 21 स्थळे, तालुका परिसर, बाजारपेठेची माहिती, जैवविविधता, आपत्कालीन मार्गदर्शन यामध्ये प्रथमोपचार, पोलीस सहाय्य, वाहतूक साधने याची माहिती दिली जाणार आहे. यातून रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन होणार आहे. जास्तीत जास्त नागरिक, तरुण-तरुणी, गृहिणी यांनी गाईड ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निखील कोळवणकर, नितीन हेगशेट्ये, अण्णा बेर्डे, प्रभाकर डाऊल यांनी केले आहे.