कशेडी बोगद्याच्या कामासाठी आणलेल्या लाखोंच्या साहित्याची चोरी
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याचे काम करणार्या शिंदे इंटरप्रायझेस यांच्या मालकीच्या बोगद्याजवळ उघड्यावर रस्त्याच्या बाजूला ठेवलेले लाखो रुपये किमतीचे साहित्य सोमवार दि. 17 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरीला गेले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
परमेश्वर पुंडलिक उबाळे (वय 41, रा. कोरवली-सोलापूर सध्या सोळजाई सायली ढाब्याच्या शेजारी, पोलादपूर जि. रायगड) याने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, उबाळे हे शिंदे इंटरप्रायझेस या कंपनीत एच. आर. म्हणून काम म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीचा लेबर क्रॉट्रक्टर, पाच कामगार, टेंम्पो चालक व क्लिनर या सात संशयितांनी एकमेकांच्या संगनमताने सुमारे 4 लाख 47 हजार 600 रू. किमतीच्या लोखंडी सळ्या, 3 हजार 500 रुपये किमतीचे युजॅकचे साहित्य, 59 हजार 477 रू.किमतीचे 13 चॅनल आदी सुमारे 5 लाख 15 हजार 907 रूपयाचे साहित्य, 600 किमतीचे वर्टिकल पाईप, 500 रू. किमतीचे 2 लोखंडी पाईप असा एकूण 5 लाख 15 हजार 907 रूपयांचा ऐवज चोरून तो टेंम्पो (एम एच 48 बीएमएम 0963) मधून चोरून नेला आहे. उबाळे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.