इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करणे आले अंगलट; गुन्हा दाखल

दापोली : दापोलीमधून एका लहान मुलाचा आक्षेपार्ह व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी दाऊद पावस्कर या संशयिताविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 मार्च 2020 रोजी हा आक्षेपार्य व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. संशयिताचे पूर्ण नाव व पत्ता आढळून येत नसल्याने तपास कार्यात पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. याची फिर्याद दापोली पोलिस स्थानकात शीतल पाटील- पोलिस उपनिरीक्षक दापोली यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 चे कलम 67 (ब )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button