पोमेंडी, फणसोपमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या ममता जोशी, राधिका साळवी तर शिरगावमध्ये ‘महाविकास’च्या फरिदा काझी विजयी

रत्नागिरी : तालुक्यातील तीन ग्रामपंचायातींसाठी रविवारी उत्स्फूर्त मतदान झाले. याचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आला.
तालुक्यातील फणसोप ग्रामपंचायतीवर  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना 1 हजार 400 मत मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना 1 हजार 36 मत मिळाली. राधिका साळवी या 364 मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 10 जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ 1 जागा शिंदे गटाकडे राहिली.
पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना 1 हजार 160 तर शिंदे गटाच्या बारगुडे यांना 892 मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या 268 मतांनी विजयी झाल्या.
शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली. सरपंच पदावर महाविकास आघाडीच्या फरिदा रज्जाक काझी या 300 मतांनी विजयी झाल्या. मात्र 17 पैकी 15 जागा जिंकत शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले. शेवटच्या फेरीपर्यंत निवडणूक रंगतदार झाली. सरपंच पदासाठी काँटे की टक्कर झाली. अखेर फरीदा काझी सरपंच म्हणून निवडून आल्या. अपक्ष उमेदवार मोरे यांनी या निवडणुकीत सरपंच पदासाठी 1700 मते घेतली. फरीदा काझी यांनी 2 हजार 60, कुमठेकर यांनी 1 हजार 750 मते घेतली.
तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतीकरिता सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. यापैकी चरवेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. तर प्रतिष्ठेची शिरगाव आणि फणसोपमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट महायुती आणि पोमेंडी बुद्रुक येथे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट विरूध्द भाजप असा तिरंगी सामना रंगला. प्रचाराच्या कालावधीत सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. प्रतिष्ठेच्या शिरगाव ग्रामपंचायतीवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले होते. या ठिकाणी तिरंगी लढत असल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाकडून आ. राजन साळवी यांनी कॉर्नर सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली.

शिरगाव ग्रामपंचायत
पोमेंडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार
फणसोप ग्रामपंचायत विजयी उमेदवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button