खेड-मंडणगडातील ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व

खेड : तालुक्यात असगणी, अस्तान, नांदगाव, सुसेरी, देवघर या ग्रामपंचायतींमध्ये दि.16 रोजी मतदान घेण्यात आले. सोमवार दि. 17 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय खेड येथे मतमोजणी झाली. तळघर व वडगाव बुद्रुक या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील वडगाव बुद्रुक, अस्तान व देवघर ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला असून या तीनही ग्रामपंचायती विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात येतात. दि.16 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. निवडणूक झालेल्या देवघर-सोंडये, सुसेरी, असगणी, नांदगाव व अस्तान या ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी 17 रोजी तहसीलदार कार्यालयात झाली. तालुक्यातील देवघर-सोंडये ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून सुनील मोरे तर सदस्य म्हणून पुष्पा मोरे, कांचन मोरे, किरण मोरे, स्नेहल मोरे, नामदेव सोंडकर, रवींद्र इंगळे व दीपाली मोरे यांची निवड झाली.
असगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून संजना बुरटे तर सदस्यपदी रिया बाईत, मेघना नायनाक, चंद्रकांत गोसावी, प्रमोद चांदीवडे, सिया मोहिते, सुविंद्र धाडवे, शाहीन इस्माईल काद्री, हाजीरा नेवरेकर व यासीन घारे या निवडून आल्या.
सुसेरी सरपंचपदी संतोष कंचावडे यांनी विजय मिळवला तर सदस्यपदी सुनील तटकरी, अश्विनी शिंदे, मंगेश जाधव, वैष्णवी सुसविरकर, सनी शिंदे, अरविंद शिर्के, स्वाती वैराग आणि आकांक्षा सावंत यांनी विजय मिळवला.
नांदगाव सरपंच म्हणून महेश पालकर यांचा विजय झाला तर सदस्य म्हणून आरिफ कादिरी, सुरैय्या कादिरी, संपदा पवार, मनोज दिवाळे, सुनील पवार, संपदा पवार, देविका जाधव, रिया बहुतुले व संतोष माळी यांचा विजय झाला.

मंडणगड तालुक्यातील घराडी व निगडी या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांच्या मतदानाचा निकाल तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली  जाहीर करण्यात आला. निकालानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाचा उदय झाल्याचे पहायला मिळाले.दोन्ही ग्रामपंचायतीवर एकट्याने लढणार्‍या आमदार योगेश कदम यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे सरपंच निवडून आले. निगडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे पूर्णपणे वर्चस्व राहीले. सरपंच व सदस्य अशा दोन्ही आघाड्यांवर बाळासाहेबांची शिवसेना गटाचा वरचष्मा राहिला तर घराडी ग्रामपंचायतीचा थेट सरपंच शिंदे गटाचा निवडून आला असला तरी 4 सदस्य आघाडीचे व 3 सदस्य शिंदे गटाचे निवडून आल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांनी निवडणूक निकालानंतर
केला.  घराडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुलभा चव्हाण, तर निगडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सईदा कोंडेकर थेट सरपंच म्हणून निवडून आल्या. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिस निरीक्षक  शैलेजा सावंत व पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून पवन गोसावी, किरण पवार यांनी काम पाहिले.
घराडी ग्रुप ग्रामपंचायत : थेट सरपंच निवडीत सुलभा  चव्हाण 510 मते मिळवून विजय झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी समिक्षा सावंत यांना 420 मते मिळाली.    प्रभाग क्रमांक एक (घराडी) मधून अनिषा फणसे 148 मते, मयुरी  मोरे 155 मते, गणेश बारस्कर 138 मते मिळवून विजयी झाले. प्रभाग क्रमांक दोनमधून (नारगोली)  दशरथ  साळुंखे, दर्शना  साळुंखे, सुशिल  वजीरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक तीन (घराडी ) मधून सविता बैकर 217 मते, माधवी सुखदरे 202 मते मिळवून विजयी झाल्या. प्रज्ञा जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
निगडी ग्रुप ग्रामपंचायत : थेट सरपंच निवड प्रक्रियेत सईदा कोंडेकर 457 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी महेफूजा कोंडकर यांना 319 मते, अनिता  साखरे यांना 5 मते मिळाली. निगडी प्रभाग क्रमांक एकमधून सचिन  सावंत 129 मते, अस्मा  चिपोलकर 144 मते मिळवून विजयी झाले. प्रभाग क्रमांक दोनमधून अशोक पवार 135 मते, गजाला कोंडकर 152 मते, संजना साखरे 136 मते मिळवून विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीनमधून कामरुन्निसा ओंबीलकर 166 मते, रुपेश  निगुडकर 158 मते मिळवून विजयी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button