रत्नागिरी टीआरपी येथून तरूण बेपत्ता
रत्नागिरी : शहरातील सह्याद्रीनगर टीआरपी येथून तरुण बेपत्ता झाला आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राज सुनील वाघाटे (राहणार सह्याद्रीनगर टीआरपी, रत्नागिरी ) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची मावशी दीपाली दीपक शिवगण (रा. सह्याद्रीनगर टीआरपी, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,4 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वा. घराच्या मागील बाजूनेच राज बेपत्ता झाला. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही तो घरी न परतल्याने मावशीने शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.